बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील एका महाविद्यालयात आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेच्या दाव्यांची पोलखोल झाली. इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी थेट परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.