येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी बापू शेलार यांनी कोथिंबिरीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संताप आणि आर्थिक नुकसानातून दीड एकर क्षेत्रातील उभी कोथिंबीर रोटावेटर फिरवून उद्ध्वस्त केली आहे. किरकोळ बाजारात शंभर रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयाला विकावी लागत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने दीड एकर क्षेत्रावरील उभ्या कोथिंबीर पिकांवर रोटावेटरच्या फिरवत भुई सपाट केले आहे.