सध्या कापसाची तोडणी सुरू असून वेगवेगळे रोगराई कापसाच्या पिकाला लागलेली आहेत. यंदा गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापूस घेतलेले शेतकरी हा कापूस कुठे विकावा अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. कारण जिल्ह्यातील दहा तालुक्यात कुठेही कापूस खरेदी केंद्र नाही आणि सध्या दरवर्षी तेलंगाना राज्यात हे शेतकरी कापूस विक्री करत असतात परंतु यंदा कापूस विक्रीला तेलंगाना राज्याने महाराष्ट्रातून बंदी घातली आहे.