नाशिकच्या अभोणा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे विहिरीत पडलेल्या तरुणाचा जीव वाचल्याचे पाहायला मिळाले. ही घटना नाशिकच्या कळवणमध्ये घडली. दादा धुमसे यांच्या मालकीच्या विहिरीत सप्तशृंग गडावरील रहिवाशी रामदास सूर्यवंशी विहिरीत पडला. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झालेत. वडाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सूर्यवंशी यांना सुखरूप बाहेर काढले. त्याला हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे. जखमी तरुणावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.