सततच्या पावसामुळे भोर - महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्यालगत साईट पट्टीला तडे गेले आहेत. तडे गेल्याने रस्त्याचा संपूर्ण भराव खचून कोणत्याही क्षणी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांची दररोज या मार्गावरून ये-जा करण्यासाठी वर्दळ असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे.