भंडारा ते पवनी महामार्गावर अनेक ठिकाणी तीन ते चार इंचीच्या पडलेल्या भेगा या अपघातांना आमंत्रण देत आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी या लांबच लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांचे संतुलन बिघडून अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसतंय.