नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या जात आहेत. मात्र गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे मूर्तिकारांना मोठा फटका बसत आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ कारखान्यांमध्ये शेकडो मूर्ती तयार होत असताना अंतिम टच देण्यासाठी लागणारा गॅस उपलब्ध नसल्याने कलाकारांनी आता इलेक्ट्रिक हीटरचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक पद्धतीने काथ्याला आगीवर आकार देण्याऐवजी हीटरच्या सहाय्याने मूर्तींना अंतिम स्वरूप दिलं जात आहे. अडचणी असूनही मूर्तिकारांनी हार न मानता काम सुरू ठेवले असून, नंदुरबारच्या गणेश मूर्ती महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही पाठवल्या जातात. त्यामुळे उत्सवाच्या काही महिने आधीपासूनच तयारी सुरू असते, मात्र सध्याच्या परिस्थितीचा परिणाम या व्यवसायावर स्पष्टपणे जाणवत आहे.