क्रिस्टियानो रोनाल्डो जगातील पहिला अब्जाधीश फुटबॉलर ठरला आहे. पोर्तुगालच्या या स्टार खेळाडूची एकूण संपत्ती $1.4 अब्ज म्हणजेच १२,३५२ कोटी रुपये इतकी आहे. पगार, गुंतवणूक, नाइकीसारख्या मोठ्या ब्रँड्सचे एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातील लोकप्रियतेमुळे त्याने हा विक्रम केला आहे.