वेंगुर्ला तालुक्यातील कामळेवीर बाजार आडेली येथे पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या घराशेजारी भली मोठी मगर पकडण्यात आली आहे. एवढी मोठी मगर नागरीवस्तीत आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री वेंगुर्ला तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळला या पावसात भक्ष्याच्या शोधात ही मगर नागरीवस्तीत घूसल्याची शक्यता आहे. ही मगर घरा शेजारी दिसून आल्यानंतर वाईल्ड लाईफ रेस्कु टीमच्या सदस्यानी या मगरीला रेस्क्यू करत रात्री वनविभागाच्या ताब्यात दिले.