मुंबईच्या पवई निटी परिसरात शुक्रवारी पहाटे 9 फूट लांबीची मगर आढळून आली.ही मगर आढळून आल्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली आहे. मगर दिसताच स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत संयुक्त कारवाई करत या मगरीला सुरक्षितपणे पकडले आहे.