मुक्ताईनगरच्या धामणदे, बेलखेड शिवारात अनेक शेतकऱ्यांची बोगस बियाणे शेतात पिके उगवली नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाने याबाबत चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. रब्बीच्या हंगामात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र शेतकऱ्यांनी आणलेला गहू हा उगवलाच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे