नंदुरबार जिल्ह्यात रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नंदूरबार आणि सुंदर्डे इथं शेती पाण्याखाली आली असून कापूस, मिरची, पपई ही पिकं धोक्यात आली आहेत. पिकं पाण्याखाली गेल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.