जळगाव येथील चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकाचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती. झालेल्या नुकसानी संदर्भात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.