गेल्या 4 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती. पेट्रोल डिझेल साठा संपणार या अफवेने नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा पंप वर लावत गर्दी केली होती. मात्र 4 दिवसानंतर ही परिस्थिती काहीशी नियंत्रण मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.