धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात गुरांची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री झाली. धुळे बाजार समितीत महाराष्ट्रासह, गुजरात आणि मध्य प्रदेशातील व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. त्यामुळे साहजिकच धुळे बाजार समितीत दुभत्या जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते.