करमाळा तालुक्यातील संगोबा येथे सीना आणि कान्होळा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले पुरातन 'आदिनाथ महाराज मंदिर' हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. निसर्गरम्य परिसरात आणि नद्यांच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन मंदिराला मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे.