हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणारे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावचे श्री काळ भैरवनाथाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं असं म्हणत मोठ्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा छबिना म्हणून या पसरणी गावाची ओळख असून या गावचे आकर्षण हे श्री काळभैरवनाथाचे बगाड आहे.