वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात खासगी बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये माल विक्री करण्याऐवजी खासगी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, नाफेडकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळत आहे.