इचलकरंजी शहरामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला असून तापमानाचा पारा आता 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. तसेच नागरिक थंड पेयांच्या स्टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत.