ग्रेटर नोएडामध्ये ओटीपी किंवा कोणताही मेसेज न येता दोन बहिणींच्या बँक खात्यातून लग्नासाठी जमा केलेले लाखों रुपये गायब झाले. मजूर कुटुंबाच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करत असून, नागरिकांना अनोळखी कॉल, लिंक आणि मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.