गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी 7 दिवसात 865 किलोमीटर सायकल चालून पंढरीची वारी सायकलने पूर्ण केली. 7 दिवसांचा प्रवास कतरून ते विठ्ठलाचे दर्शन करून ते आज गोंदिया येथे परतले आहेत. गोंदियात आल्यावर सायकलिंग संडे ग्रुप द्वारा सायकलिस्ट देवानंद भांडारकर यांच्या जंगी स्वागत करण्यात आले.