कोलकत्ता ते कन्याकुमारी असा ३०६६ किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या १६ दिवसांत पूर्ण करून पुण्याच्या राजगुरुनगर येथील श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील यांनी हा विक्रम केला आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी दररोज साधारण १९० किलोमीटरपेक्षा अधिक सायकल चालवत Pollution Free India आणि Road Safety ची जनजागृती केली.त्याच्या या विक्रमाचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.