आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होऊन गॅस मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी बंद पडलेले गोबरगॅस पुन्हा वापरण्यास केले सुरू. गॅस सिलिंडर टंचाईच्या काळात गोबरगॅसचे महत्त्व नागरिकांना कळले असून, ग्रामीण भागातील गावागावांमध्ये बहुतांशी जणांचे गोबर गॅस पुन्हा एकदा पेटू लागले आहेत. ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे गायीचे शेण, तसेच मलमूत्र वापरून तयार केलेल्या गोबर गॅसवर, सध्याच्या काळात आठ ते दहा लोकांचा स्वयंपाक दररोज केला जातोयं..