पूरामुळे डहाणू शहरात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे डहाणूला जोडणारे रस्ते जलमय झाले आहेत. डहाणू - जव्हार राज्य मार्गांवर सरावली येथे रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, रस्ते पाण्याखाली असून देखील काही अती उत्साही वाहन चालक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात वाहन नेत आहेत. अशीच एक आलिशान कार पुराच्या पाण्यात अडकली आहे. लहान मुलांना घेऊन महिला पुरातून चालत आहेत.