दहिसर ते काशीगाव मेट्रो नऊ मार्गीकेचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीकडून मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे दहिसर ते मीरा भाईंदर मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे.