वयाच्या 90 व्या वर्षी अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी मेडिटेशन - द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या ऑडिओ बुकसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. शांततेचे नोबेल विजेते दलाई लामांनी मिळवलेला हा सन्मान भगवान बुद्धांचे विचार आणि शांतता, करुणा या मूल्यांचे महत्त्व दर्शवतो.