चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे आणि कळंमडु परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर आता प्रशासनाने मदत प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानग्रस्त शेतांची संयुक्त पाहणी करत पंचनामे सुरू आहेत. वाहून गेलेली शेती, सुपीक माती, फळबागा आणि पिकांचे झालेले नुकसान याची प्रत्यक्ष नोंद केली जात आहे.