गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या खड्डेमय मार्गाने प्रवास करावा लागतो. तर यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता बनविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते मात्र अद्यापपर्यंत मार्ग न बनल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी केलेली आहे.