उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील हिराघाट परिसरात आज धक्कादायक घटना घडली. पुनर्बांधणीसाठी पाडकाम सुरू असताना ‘लेक व्ह्यू’ ही चार मजली इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.