विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज सुमारे तीन किलोमीटर जंगलातून सायकलने किंवा पायी जावे लागते. या मार्गावर वाघ, अस्वल, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा धोका कायम असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.