बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करत जावे लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. धुनकवाड येथील भंडारे वस्तीवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दीड किलोमीटरचे अंतर डोंगराळ भागातून मार्ग काढत पार करावे लागत आहे.पाऊस झाल्यावर या मार्गावर ओढा असल्याने ओढ्याला पाणी आल्यास या विद्यार्थ्यांना शाळेत देखील जाता येत नाही. कुठलीही दुर्घटना होण्याआधी या याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी धनुकवाड येथील नागरिकांकडून केली जात आहे.