रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह हर्णे गावातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.