श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आजपासून ऑनलाइन पासची सक्ती शिथिल करून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. धुक्याच्या वातावरणात अनेक वाहनेही भीमाशंकरकडे दाखल झाली.