सातारामधील सज्जनगडावर दास नवमी उत्सवानिमित्त समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी याबरोबरच पंचधातूच्या श्रीराम मूर्तीची विशेष पूजा करून उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाला नामांकित कीर्तनकार गायक ,वादक हे या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात कीर्तनकार शामबुवा घुमकेकर ,नागपूर यांचे कीर्तनाने सुरुवात झाली तर चेन्नई येथील लालगुडी कृष्णन यांच्या व्हायोलीन वादनाने रंगत वाढविली.