साताऱ्यातील करंडी गावच्या ६७ वर्षीय अशोक जाधव यांनी एकट्याने गावात साडे तीन किलोमीटरचा रस्ता डोंगर पोखरुन तयार केला आहे. श्री सिलोबा गडावरील खडतर वाट त्यांनी आपल्या श्रमातून ३.५ किलोमीटरची प्रशस्त मार्गात परिवर्तित केली आहे.श्री सिलोबा गड हे या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद निसरडी आणि जीवघेणी पायवाट होती.