राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. छावा क्रांतीवीर सेनेने मका खरेदी तसेच कांदा आणि दुधाला हमीभाव देण्याबाबत निवेदन सादर केले होते. यावर कृषीमंत्र्यांनी संबंधित पणन व दुग्धविकास मंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.