राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या एखाद्या कृतीमुळे... अशातच अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये अजित पवार यांची खुर्ची शरद पवार यांच्या बाजुला होती, मात्र त्यांनी ती बदलली. यामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय.