धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत मेलेलं झुरळ आढळून आलं आहे. झुरळ निघाल्याची तक्रार केल्यानंतर ग्राहकाला हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्यात आल्याचा देखील आरोप होत आहे. मात्र ग्राहकाच्या तक्रारीवर हॉटेल मालकाने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.