१ डिसेंबर २०२५ पासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल दिसतील, जे तुमच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करतील. विमान प्रवास महाग होणार, तर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहेत. डिसेंबरमध्ये १८ दिवस बँकांना सुट्टी असेल. आरबीआयच्या बैठकीत ईएमआय कमी होण्याचा निर्णय अपेक्षित असून, अमेरिकन टॅरिफवरही निर्णय शक्य आहे.