दीपक केसरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती, असेही केसरकर यांनी सांगितले.