दिवाळी नंतर ज्या दिवशी घरो-घरी दीपोत्सव साजरा केला जातो,तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पोर्णिमा. त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर, देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळत आहे. त्रिपुरा पोर्णिमेच्या निमित्ताने भीमाशंकरला शिवलिंगाला श्रृंगार करत रांगोळीने सजविण्यात आले यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली.