येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर हरीण संवर्धन क्षेत्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे हरीण आणि काळवीटांची भटकंती सुरु असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हे वन्यप्राणी शेती परिसराच्या दिशेनेही येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.