नाशिक : येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात हरणांसह काळविटांची मोठी संख्या असून वाढत्या उन्हामुळे त्यांच्या हालचालींमध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. अन्न -पाण्याच्या शोधात हरणांचे कळप आता वाड्या-वस्त्यांकडे वळताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतात डोंगळे लावले असून तेथे हरणे पाणी पिताना दिसतात. मात्र तीव्र उष्णतेमुळे या प्राण्यांची भटकंती वाढली असून नगरसुल भागातील शेतांमध्ये हरणांचा कळप हा दिसून आला आहे