जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरची वारी करून आज देहूनगरीत पुन्हा परतली. पालखीचे देहूत आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.