दिल्लीतील गंभीर वायुप्रदूषणावर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू आहे. क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळवारी पावसाची चाचणी केली जाईल. 1946 मध्ये शोध लागलेल्या या तंत्रज्ञानात विमानांद्वारे ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड, मीठ आणि ड्राय आईस सोडून नैसर्गिक ढगांमधून पाऊस पाडला जातो, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल.