समीर वानखेडे मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटला नोटीस बजावली आहे. नेटफ्लिक्सलाही समन्स पाठवण्यात आले आहे. एका वेब सिरीजमुळे प्रतिमा खराब झाल्याचा आरोप करत वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.