दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोट प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, स्फोट झालेल्या ठिकाणाहून दोन जिवंत काडतुसे एफएसएल पथकाने जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांनी ही काडतुसे ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्फोटाच्या कारणाबाबतच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे.