दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका उभ्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्याने दर्यागंज परिसरात मोठी दहशत पसरली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांना जोरदार आवाज ऐकू आला आणि नंतर घटनास्थळी मानवी हात व फुफ्फुस पडलेले दिसले. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, स्फोटामुळे अनेक वाहने जळून खाक झाली आहेत. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.