पहलगाम हल्ल्यातील आयएसआय एजंटची मोठी कबुली समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं. आयएसआय एजंट अन्सारूल मियॉची चौकशी सुरू असताना त्यादरम्यान, मोठी कबुली समोर आली आहे. अन्सारूल मियॉ हा नेपाळी वंशाचा आयएसआय एजंट आहे. अन्सारूल मियॉ दिल्लीतील अनेक ठिकाणांची रेकी करत होता.