शासकीय आश्रमशाळांमध्ये १००% शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी संतप्त पालकांनी सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर, डोल्हारे,माणी, बुबळी, सालभोये तर कळवण तालुक्यातील बापखेडा,देसगाव आणि काठरेदिगरमधील शासकीय आश्रम शाळांना टाळे ठोकत विद्यार्थ्यांना घरी नेले.